IPLच्या लिलावाआधी ‘या’ खेळाडूने घेतली निवृत्ती

IPLच्या लिलावाआधी ‘या’ खेळाडूने घेतली निवृत्ती

Published by :
Published on

IPL 2021च्या लिलावासाठी अवघा एक दिवस उरला असताना एका स्टार खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.दरम्यान या खेळाडूंच्या निवृत्तीने क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी आहे.

गेली अनेक वर्षे चेन्नई सुपरकिंग संघाचा आणि दक्षिण आफ्रिकन संघाचा दमदार फलंदाज म्हणून ओळख असणाऱ्या फाफ डु प्लेसिस याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आज त्याने आपला हा निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केला. फाफ डु प्लेसिसने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.

पोस्टमध्ये काय लिहलय…

"माझ्यासाठी असा निर्णय घेणं खूपच कठीण होतं. पण भविष्याचा विचार करून आणि नव्या आव्हानांना तोंड देण्याच्या उद्देशाने मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो. १५ वर्षांपूर्वी मला कोणी सांगितलं असतं की मी आफ्रिकेकडून ६७ कसोटी सामने खेळणार आहे आणि काही सामन्यांचे नेतृत्व करणार आहे, तर माझा माझ्यावर विश्वास बसला नसता. पण आता पुढील दोन वर्षात दोन टी२० विश्वचषक आहेत. त्या स्पर्धांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने मी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे", अशा आशयाचं पत्र त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com