Tokyo Olympic 2020: महिला हॉकी संघाची विजयी आगेकूच

Tokyo Olympic 2020: महिला हॉकी संघाची विजयी आगेकूच

Published by :

टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेवर 4-3 विजय मिळवला. गोलची हॅट्ट्रिक करणारी वंदना कटारिया या विजयाची शिल्पकार ठरली. या विजयासह महिला हॉकी संघाच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ब्रिटन आणि आयर्लंड यांच्यातील लढत बरोबरीत संपली किंवा ब्रिटनने तो सामना जिंकला तर भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत जाईल. आयर्लंडने सामना जिंकला तर भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com