Tokyo Olympic | रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानू ठरणार सुवर्णपदाची मानकरी?
टोकियो ऑलिम्पिकचा पहिला दिवस भारतासाठी अविस्मरणीय ठरला होता. वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकत भारताचे पदकांचे खाते उघडून दिले होते. हे भारताचे यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धांतील आतापर्यंतचे एकमेव पदक आहे. मीराबाईने ४९ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये ८७ किलो, तर क्लीन आणि जर्कमध्ये ११५ किलो असे एकूण २०२ किलोचे वजन उचलत रौप्यपदक जिंकले होते.
मात्र, आता तिच्या या रौप्यपदकाचे रूपांतर सुवर्णपदकात होऊ शकेल. याचे कारण म्हणजे, या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या चीनच्या होऊ झीहोईची उत्तेजक द्रव्य चाचणी (डोपिंग टेस्ट) होणार आहे. यात ती दोषी आढळल्यास तिचे पदक काढून घेतले जाईल आणि मीराबाई सुवर्णपदकाची मानकरी ठरेल.
मीराबाईने एकूण २०२ किलोचे वजन उचलत रौप्यपदक जिंकले. कर्णम मल्लेश्वरीनंतर (२००० सिडनी) ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मीराबाई ही भारताची दुसरी वेटलिफ्टर होती.