U19 IND vs PAK
U19 ASIA CUP 2025 FINAL: INDIA SUFFER HEAVY DEFEAT, PAKISTAN CROWNED CHAMPIONS

U19 IND vs PAK: निर्णायक लढतीत भारताचा लाजिरवाणा पराभव, पाकिस्तानने जिंकला आशिया चषक

Pakistan Champions: अंडर-१९ आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताची फलंदाजी कोसळली. पाकिस्तानने १९१ धावांनी दणदणीत विजय मिळवत ट्रॉफी जिंकली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

अंडर-१९ आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने टीम इंडियावर १९१ धावांनी विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरले. गेल्या अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली असली तरी भारताला निराशा हात लागली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ८ विकेट्स गमावून ३४७ धावांपर्यंत मजल मारली. समीर मिन्हासने विस्फोटक १७२ धावांची खेळी साकारली तर अहमद हुसैनने ५६ धावांची योगदान दिले. इतर फलंदाजांनीही चांगले समर्थन देत ३४८ धावांचे अवघड आव्हान भारतासमोर ठेवले.

U19 IND vs PAK
T20 World Cup 2026: शुभमनप्रमाणेच सूर्याचा पत्ताही कट होणार होता? कॅप्टन्सीमुळे मिळालं ‘जीवदान’

भारताकडून कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या स्टार जोडीवर स्फोटक सुरुवातची जबाबदारी होती. दोघांनी समाधानकारक सुरुवात केली तरी विजयी पाठलागासाठी खास करणे शक्य झाले नाही. तिसऱ्या ओव्हरमध्ये आयुष २ धावांवर आऊट झाला आणि भारताने ३२ धावांवर पहिली विकेट गमावली. वैभवने वादळी सुरुवात केली, १० चेंडूत ३ षटकार आणि १ चौकारासह २६ धावा केल्या, पण फटकेबाजीच्या प्रयत्नात माघार घेतली. एरॉन जॉर्जने १६ धावा केल्या, तर विहान मल्होत्रा (७) आणि वेदांत त्रिवेदी (९) ला फार काही करता आले नाही. ९.४ ओव्हरांत ५ विकेट्स गमावून भारत ६८ धावांवर सापडला.

U19 IND vs PAK
T20 World Cup 2026: रोहित–विराटच नाही! T20 विश्वचषकातून वगळले गेले हे 7 मोठे भारतीय दिग्गज

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारतावर घट्ट मदार घेतली. १० ओव्हरांत ५ झटके देत सामन्यावर पकड मिळवली. अभिग्यान कुंदू (१३), खिलान पटेल (१९) आणि दीपेश देवेंद्रन (३६) यांनी छोटेखाणी खेळी केल्या, पण इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. शेवटी २६.२ ओव्हरांत १५६ धावांवर भारत पॅक अप झाला. पाकिस्तानसाठी अली रझाने ४ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सय्याम, अब्दुल सुभान आणि हुझेफा अहसान यांनी प्रत्येकी २ विकेट्स नोंदवल्या. या पराभवाने भारताची ट्रॉफीची आशा धुळीला मिळाली असली तरी पाकिस्तानने कायमस्वरूपी आठवण करून दिली.

Summary
  • अंडर-१९ आशिया चषक फायनलमध्ये भारताचा १९१ धावांनी पराभव

  • पाकिस्तानकडून समीर मिन्हासची दमदार १७२ धावांची खेळी

  • आयुष–वैभवसह भारतीय फलंदाजी पूर्णपणे अपयशी

  • पाकिस्तानने दणदणीत विजयासह आशिया चषकावर नाव कोरले

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com