Virat Kohli

Virat Kohli: विराट कोहलीच्या बॅटनं धावांचा पाऊस, पण वैयक्तिक पातळीवर निराशेची बातमी समोर

ICC Rankings: आयसीसीच्या ताज्या वनडे रँकिंगमध्ये विराट कोहलीला नंबर एक स्थान गमवावं लागलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

आयसीसीने वनडे फलंदाजांची ताजी रँकिंग जाहीर केली असून, यात भारतीय स्टार विराट कोहलीसाठी वाईट बातमी आहे. मागच्या रँकिंगमध्ये नंबर एकवर असलेला कोहली आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याच्या जागी न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल वनडे फलंदाज म्हणून जगातील नंबर एक क्रमांकावर पोहोचला आहे.

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत ३५२ धावा ठोकणाऱ्या मिचेलने त्याच्या रेटिंग पॉइंट्समध्ये जबरदस्त उसळी घेतली आहे. ताज्या रँकिंगनुसार, मिचेलकडे आता ८४५ रेटिंग पॉइंट्स आहेत, जे मागील रँकिंगमधील ७९४ पॉइंट्सपेक्षा ५१ पॉइंट्सने जास्त आहेत. दुसरीकडे, विराट कोहलीचे रेटिंग पॉइंट्स ७९५ वर स्थिर आहेत, पण मिचेलच्या प्रगतीमुळे तो नंबर दोनवर राहिला आहे. कोहली मागच्या आठवड्यात रोहित शर्माला मागे टाकून अव्वल स्थान मिळवले होते, पण केवळ एका आठवड्यात मिचेलने ते कसे हिरावले.

भारतीय चाहत्यांना कोहलीची नंबर एक पोजिशन गेल्याने नक्कीच निराशा झाली असली, तरी एक सकारात्मक बाब ही आहे की टॉप पाच फलंदाजांपैकी तीन भारतीय आहेत. विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर कर्णधार रोहित शर्मा चौथ्या आणि तरुण सलामीवीर शुबमन गिल पाचव्या स्थानावर कायम आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com