Virat Kohli : चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत अडकला विराट कोहली; अस्वस्थ चेहरा, सुरक्षेची चिंता आणि VIDEO व्हायरल
भारत-न्यूझीलंड तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सज्ज झाली असून, पहिला सामना ११ जानेवारीला खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहली ७ जानेवारीला वडोदरा विमानतळावर दाखल झाला, तेव्हा चाहत्यांनी गराडा घातला. काळ्या टीशर्ट आणि सनग्लासेसमधील कोहलीला पाहताच हजारो चाहत्यांनी 'कोहली-कोहली'च्या घोषणा दिल्या आणि फोटोसाठी गर्दी केली. इतकी गर्दी होती की, सुरक्षा रक्षकांना कसाबसा कोहलीला गाडीपर्यंत नेले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांचा उत्साह दिसत आहे.
टीम इंडियात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह अनुभवी खेळाडू आहेत. संपूर्ण संघ: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, प्रदीप कृष्णा, अर्शदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी आणि यशस्वी जयस्वाल.