विराट आऊट; रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या कर्णधारपदी ‘हा’ खेळाडू
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (Royal Challengers Bangalore) आयपीएल 2022 (IPL 2022) पूर्वी आपला कर्णधार बदलला आहे. विराट कोहलीची जागी आता दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू फाफ डु प्लेसिसची नवीन कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार म्हणून IPL-2021 हा त्याचा शेवटचा हंगाम असल्याचे विराट कोहलीने गेल्या वर्षी जाहीर केले होते. आयपीएल 2021 दरम्यान त्याने कर्णधारपद सोडले. 2013 पासून विराट कोहली या संघाचे नेतृत्व करत होता. यंदाच्या मोसमात आरसीबी कोणाला कर्णधार बनवणार याची सर्वांनाच प्रतीक्षा होती. त्यानंतर आज फाफ डू प्लेसिसची (Faf Du Plessis) आरसीबीच्या नवीन कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याने विराट कोहलीची जागा घेतली आहे. फाफ डु प्लेसिस हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू आहे. तो बराच काळ आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग राहिला आहे.
फॅफ डू प्लेसिसने आयपीएलमध्ये 100 सामने खेळले असून 34.94 च्या सरासरीने 2935 धावा केल्या आहेत. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 22 अर्धशतके झळकावली आहेत.