KKR Vs SRH, IPL 2024
KKR Vs SRH, IPL 2024

IPL 2024 Final: सर्वात महागडा गोलंदाज SRH साठी ठरला हुकमी एक्का! पॉवर प्ले मध्येच स्टार्कने KKR दिला मोठा दणका, पाहा Video

स्टार्कने फायनलच्या सामन्यात पॉवर प्ले मध्ये दोन विकेट घेऊन हैदराबादला मोठा दणका दिला. स्टार्कच्या भेदक गोलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Published by :

Mitchell Starc Bowling Viral Video : आयपीएल २०२४ चा फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये रंगत आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पॉवर प्ले मध्येच हैदराबाद संघाचं कंबरडं मोडलं. स्टार्कने फायनलच्या सामन्यात पॉवर प्ले मध्ये दोन विकेट घेऊन हैदराबादला मोठा दणका दिला. स्टार्कच्या भेदक गोलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या फलंदाजांना मिचेल स्टार्कने दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता

यंदाच्या आयपीएल लिलावात सर्वात महागडा ठरलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने हैदराबादसाठी चमकदार कामगिरी केली. स्टार्कने एसआरएचचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माची (२) दांडी गुल केली.

तर राहुल त्रिपाठीलाही (९) धावांवर झेलबाद केलं. स्टार्कने भेदक मारा करून इनिंगच्या सुरुवातीलाच हैदराबादचे महत्त्वाचे दोन फलंदाज बाद केले. त्यामुळे स्टार्क केकेआरासाठी हुकमी एक्का ठरला आहे.

'अशी' आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११

कोलकाता नाईट रायडर्स : सुनील नरेन, रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसल, रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, हर्षीत राणा

KKR चे इम्पॅक्ट प्लेयर्स : नितीष राणा, अनुकूल रॉय, मनीष पांडे, के एस भरत, शेरफेन रदरफोर्ड

सनरायजर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, ट्रेविस हेड, नितीश कुमार रेड्डी, अॅडम मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट, टी नटराजन

SRH चे इम्पॅक्ट प्लेयर्स : ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, वॉशिंगटन सुंदर, अब्दुल समद, उमरान मलिक

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com