Mirabai Chanu
Mirabai Chanu

Mirabai Chanu : अभिमानास्पद! मीराबाई चानूने 199 किलो वजन उचलून पटकावलं सिल्वर मेडल

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूने रचला इतिहास
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूने रचला इतिहास

  • मीराबाई चानूने 199 किलो वजन उचलून पटकावलं सिल्वर मेडल

  • मीराबाई चानूने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात चमक दाखवली

(Mirabai Chanu) भारतीय वेटलिफ्टिंगची ओळख बनलेली मीराबाई चानूने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात चमक दाखवली आहे. नॉर्वेमधील फोर्डे येथे सुरू असलेल्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये तिने एकूण 199 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावले. हा तिच्या कारकिर्दीतील तिसरा जागतिक पदक असून, जागतिक स्तरावर सर्वाधिक पदके जिंकणाऱ्या भारतीय वेटलिफ्टरमध्ये ती अग्रस्थानी पोहोचली आहे.

चानूने याआधी 2017 मध्ये अमेरिकेतील अनाहाईम येथे 48 किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर 2022 मध्ये बोगोटा येथे 49 किलो गटात तिने रौप्य पदक पटकावले. यंदाच्या स्पर्धेत तिने आपला फॉर्म कायम ठेवत पुन्हा देशासाठी मोठा सन्मान मिळवला.

या वेळी 48 किलो गटात स्पर्धा करताना चानूने स्नॅचमध्ये 84 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो असे एकूण 199 किलो वजन उचलले. या कामगिरीमुळे तिला दुसरे स्थान मिळाले. उत्तर कोरियाच्या रि सांग गुम हिने 213 किलो वजन उचलून सुवर्ण मिळवले. तर चीनच्या थान्याथनसोबत चानूची कांटेची टक्कर पाहायला मिळाली.

स्नॅचमध्ये थान्याथन 4 किलोने पुढे होती, मात्र क्लीन अँड जर्कमध्ये चानूने अप्रतिम प्रदर्शन करत तिला मागे टाकले आणि अवघ्या 1 किलोच्या फरकाने रौप्य आपल्या नावे केले. थान्याथनला अखेरीस कांस्यावर समाधान मानावे लागले. या यशानंतर चानूने आपल्या प्रशिक्षक विजय शर्मा यांचे आभार मानले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com