Legends League Cricket: मैदानात राडा, फिक्सर, आरोप; श्रीसंत-गंभीरच्या भांडणात नेमकं काय घडलं?

Legends League Cricket: मैदानात राडा, फिक्सर, आरोप; श्रीसंत-गंभीरच्या भांडणात नेमकं काय घडलं?

भारतात सध्या टीम इंडियाच्या सिनीअर खेळाडूंची लिजेंड्स क्रिकेट लीग सुरू आहे. या लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये माजी क्रिकेटर गौतम गंभीर आणि माजी क्रिकेटर श्रीसंत भिडल्याची घटना घडली आहे.
Published by :
Team Lokshahi

सध्या सोशल मीडियावर आणि क्रिकेट चाहत्यांच्या चर्चांमध्ये एक गोष्ट ट्रेंडिंगला आहे. भारतात सध्या टीम इंडियाच्या सिनीअर खेळाडूंची लिजेंड्स क्रिकेट लीग सुरू आहे. या लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये माजी क्रिकेटर गौतम गंभीर आणि माजी क्रिकेटर श्रीसंत भिडल्याची घटना घडली आहे. या दोघांमध्ये मैदानावर मोठा वाद झाल्याची माहिती आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे. नेमका या दोन खेळाडूंमध्ये काय राडा झालेला? हे जाणून घेऊया.

गौतम गंभीर कर्णधार असलेल्या इंडिया कॅपिटल्स आणि पार्थिव पटेल कर्णधार असलेल्या गुजरात जाएंटस या दोन संघात 6 डिसेंबरला सूरतमध्ये सामना रंगला होता. या सामन्यात गौतम गंभीर आणि गुजरात संघाकडून खेळणाऱ्या श्रीसंतमध्ये मैदानावर मोठा वाद झाला होता. या वादाचा व्हिडिओ आता श्रीसंतने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला श्रीसंत लिहतो की, गौतम गंभीरने असं काही बोलून गेला आहे,जे त्याने वरिष्ठ खेळाडू म्हणून बोलायला नको होते. या व्हिडिओमध्ये श्रीसंतने गौतमला ‘मिस्टर फायटर’ म्हटले आहे.

या सामन्यात गंभीरच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. श्रीशांतने सामन्यातील दुसरे षटक टाकले. श्रीसंतच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर गंभीरने षटकार मारला. तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. मात्र, पुढच्या चेंडूवर एकही धाव आली नाही. यावेळी श्रीशांत गंभीरला काहीतरी म्हणाला. गंभीरने श्रीशांतकडे रागाने पाहिले. दोघांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. या सामन्यात गंभीरने शानदार अर्धशतकी खेळी खेळली. 30 चेंडूंचा सामना करताना त्याने सात चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 51 धावांची खेळी केली. याआधी गंभीरने भिलवाडा किंग्जविरुद्ध 63 धावांची इनिंग खेळली होती.

सामन्यानंतर श्रीसंतने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत त्याने गंभीरवर टीका केली आहे. या व्हिडिओत श्रीसंतने गौतम गंभीरचा मिस्टर फायटर असा उल्लेख करत काय वाद झाला, याची माहिती दिली. ‘तो नेहमी त्याच्या सर्व सहकाऱ्यांशी भांडतो, तेही विनाकारण…’. ‘तो वीरू भाईसह त्याच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंचाही आदर करत नाही’. आज नेमके तेच झाले. तो मला पुन्हा पुन्हा भडकवत होता, तो फक्त माझ्याशी अशाच गोष्टी सांगत होता ज्या अत्यंत अशोभनीय होत्या, ज्या गौतम गंभीरने बोलायला नको होत्या, असे श्रीसंतने सांगितले.

दरम्यान, इंडिया कॅपिटल्स आणि गुजरातच्या संघामध्ये झालेल्या मॅचच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये गंभीर आणि श्रीसंतमध्ये बाचाबाची झाली होती. गंभीरने श्रीसंतच्या पहिल्या चेंडूवर षटकार तर दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. यानंतर गंभीरचे पुढचे दोन चेंडू डॉट्स होते. चौथ्या चेंडूनंतर श्रीशांत आणि गंभीर यांच्यात बाचाबाची झाली.

सामन्याबाबत बोलायचे झाल्यास गंभीरच्या इंडिया कॅपिटल्सने हा सामना 12 धावांनी जिंकला आणि श्रीसंतच्या गुजरात जायंट्सला स्पर्धेतून बाहेर फेकले. कॅपिटल्सचा सामना आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मणिपाल टायगर्सशी होईल आणि ते अर्बनरायझर्स हैदराबादविरुद्ध अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com