कुस्तीपटू विनेश फोगाटवर निलंबनाची कारवाई

कुस्तीपटू विनेश फोगाटवर निलंबनाची कारवाई

Published by :

भारतीय महिला कुस्तीपट्टू विनेश फोगाटवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विनेशवर बेशिस्त वागणूकीचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे.कुस्तीमहासंघाने ही कारवाई केली. त्यामुळे विनेश फोगाटच्या अडचणीत वाढ झाली आहे.

विनेशने टोकियोत इतर भारतीय कुस्तीपटूंसोबत सराव करण्यास नकार दिला होता. याचसोबत तिने सामन्यादरम्यान कुस्ती महासंघाचे अधिकृत स्पॉन्सर असलेली जर्सीही घातली नाही. इतकच नव्हे तर इतर भारतीय खेळाडूंसोबत सराव न करता विनेशने आपले परदेशी कोच वोलर अकोस यांच्यासोबत सराव करणं पसंत केलं. त्यातच विनेशकडून पदकाची अपेक्षा असताना तिचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं. इतकच नव्हे तर विनेशला रेपिचाजमध्ये खेळायची संधी मिळाली नाही. त्यामुळे कुस्ती महासंघ विनेश फोगाटवर नाराज असल्याचं कळतंय.

सध्या विनेशवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई ही तात्पुरत्या स्वरुपाची असली तरीही १६ ऑगस्टपर्यंत विनेशला आपलं उत्तर कुस्ती महासंघाला द्यायचं आहे. १६ तारखेपर्यंत कुस्ती महासंघाला जर समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर विनेश फोगाटवर जास्त काळासाठी निलंबनाची कारवाई होण्यचाी शक्यता आहे. दरम्यान कुस्ती महासंघाने सोनम मलिक या कुस्तीपटूलाही नोटीस पाठवली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com