ब्रिजभूषण सिहांना दिलासा! 'त्या' प्रकरणात  क्लीन चिट; पोलिसांनी दाखल केला क्लोजर रिपोर्ट

ब्रिजभूषण सिहांना दिलासा! 'त्या' प्रकरणात क्लीन चिट; पोलिसांनी दाखल केला क्लोजर रिपोर्ट

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांना क्लीनचिट दिली आहे. पोलिसांनी पटियाला हाऊस न्यायालयात पॉक्सो प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. पोलिसांच्या अहवालाची दखल घेत न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ जुलै रोजी ठेवली आहे.

कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावत मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर दिल्ली पोलीस या प्रकरणाची चौकशी करत होते आणि आज या आरोपांबाबतचा १ हजार पानांचा अहवाल न्यायालयात दाखल केला. या अहवालात अल्पवयीन मुलीचे वक्तव्य आणि आतापर्यंतच्या तपासाबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणात ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे आम्ही या प्रकरणाचा तपास बंद करत आहोत, असे पोलिसांनी म्हंटले आहे.

माहितीनुसार, न्यायदंडाधिकार्‍यांसमोर दिलेल्या पहिल्या जबाबात अल्पवयीन मुलीने लैंगिक शोषण केल्याचे सांगितले होते. तर, दुसऱ्या निवेदनात अल्पवयीन मुलीने लैंगिक शोषणाचा आरोप मागे घेतला आहे आणि माझी निवड झाली नाही, मी खूप मेहनत केली होती. मी डिप्रेशनमध्ये होतो, त्यामुळे रागाच्या भरात मी लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला होता, असे म्हंटले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गेल्या महिन्यात 23 एप्रिल रोजी कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी ब्रिजभूषण सिंह शरण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात धरणे आंदोलनही केले होते. यानंतर त्यांनी बृजभूषण सिंह शरण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला. यावर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला होता. यावर आज पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com