Chandrayaan-3
Chandrayaan-3Team Lokshahi

Chandrayaan-3: मिशनचे पहिली छायाचित्रे समोर

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एक डॉक्यूमेंट्री 'स्पेस ऑन व्हील्स' मध्ये हे छायाचित्रे प्रदर्शित केले
Published by :
shweta walge

कोविड19 च्या महामारीमुळे चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मिशनला उशीर झाला आहे. मात्र आता या मिशनची पहिले छायाचित्रे समोर आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ISRO एक डॉक्यूमेंट्री (Documentary) 'स्पेस ऑन व्हील्स' (Space on Wheels) मध्ये हे छायाचित्रे प्रदर्शित केले आहे. भारताने लॉन्च केलेले 75 उपग्रह (satellite) या डॉक्यूमेंट्रीमध्ये दर्शवण्यात आले आहे.

चांद्रयान-3 (Chandrayaan-3) लँडर चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करताना कसा दिसतो ते व्हिडिओमध्ये दाखवले आहे. 2019 मध्ये चंद्राजवळ क्रॅश झालेल्या चांद्रयान-2 नंतर हे मिशन तयार करण्यात आले आहे. पृष्ठभागापासून सुमारे 350 मीटर उंचीवरून वेगाने फिरत असताना ते जमिनीवर पडले होते.

चांद्रयान-2 मोहिमेतील लँडरचा भाग पार पाडला असता तर पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर यशस्वीपणे उतरणारा भारत हा पहिला देश बनला असता. चांद्रयान-3 आता विक्रम आणि प्रज्ञान सारखाच पेलोड वाहून नेण्यासाठी सज्ज आहे, ज्यामुळे इस्रोला इतर देशांसोबतच्या संयुक्त उपक्रमांसह आपली क्षमता आणि प्रगती दाखवता येईल.

इस्रोचे म्हणणे आहे की ते या वर्षी ऑगस्टपर्यंत हे अभियान सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या क्षणी हे कठीण दिसते, कारण अनेक हार्डवेअर चाचण्या अद्याप बाकी आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, अंतराळ विभागाने एका लेखी उत्तरात सांगितले की चांद्रयान-3 वर काम सुरू आहे आणि ते यावर्षी ऑगस्टमध्ये लॉन्च केले जाईल. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, कोविड-19 मुळे हे अभियान लांबले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com