एलॉन मस्क यांची मोठी घोषणा; ट्विटर ब्लू सब्स्क्रायबर्सना आता दोन तासांचे व्हिडीओ अपलोड करता येणार

एलॉन मस्क यांची मोठी घोषणा; ट्विटर ब्लू सब्स्क्रायबर्सना आता दोन तासांचे व्हिडीओ अपलोड करता येणार

एलॉन मस्कने ट्विटर टेकओव्हर केल्यापासून ते या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत काही बदल करत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

एलॉन मस्कने ट्विटर टेकओव्हर केल्यापासून ते या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत काही बदल करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता एलॉन मस्क यांनी मोठी घोषणा केली आहे.

ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन घेणाऱ्या ग्राहकांना ट्विटरकडून इतरही अनेक सुविधा दिल्या जातात. त्यात आता अजून एका गोष्टीची भर पडली आहे. ती म्हणजे ट्विटर ब्लूचे सदस्यांना आता दोन तासांची व्हिडीओ क्लिप अपलोड करु शकणार आहेत.

ट्विटर ब्लू व्हेरिफाईड सब्सक्रायबर आता दोन तासांचा व्हिडीओ अपलोड करू शकतात." म्हणजेच, ही सेवा मिळवण्यासाठी यूजर्सना ट्विटर ब्लूचं सदस्यत्व घ्यावं लागेल. असे एलॉन मस्क याने ट्विट केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com