भारताचा चीनवर 'डिजिटल स्ट्राईक; केंद्र सरकारकडून 200 हून अधिक चायनीज ॲप्सवर बंदी

भारताचा चीनवर 'डिजिटल स्ट्राईक; केंद्र सरकारकडून 200 हून अधिक चायनीज ॲप्सवर बंदी

केंद्र सरकारने 200 हून अधिक चायनीज ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

केंद्र सरकारने 200 हून अधिक चायनीज ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. अनधिकृत प्रकारे कर्ज देणाऱ्या 94 ॲप्स ब्लॉक करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने या आठवड्यात अनेक चिनी ॲप्सवर बंदी घालण्याची शिफारस माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला केली होती. आता मंत्रालयाने यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.

या ॲप्सच्या मदतीने चीनकडून भारतात बेकायदेशीर कर्ज, सट्टेबाजी आणि जुगाराचा व्यवसाय चालवला जात होता. यामुळे भारत सरकारने कठोर पाऊलं उचलतं चीनवर 'डिजिटल स्ट्राईक' केला आहे. याआधीही भारत सरकारने अनेक चिनी ॲप्सवर बंदी घातली आहे.बेटिंग, जुगार आणि मनी लाँड्रिंगसारख्या गैरप्रकारांमध्ये गुंतलेल्या 138 ॲप्सना ब्लॉक करण्याचा आदेश 4 फेब्रुवारीलाच जारी करण्यात आला.

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गृह मंत्रालयाच्या सूचनांनुसार 232 चिनी ॲप्स ब्लॉक करण्याचे आदेश जारी केले आहेत. हे चिनी ॲप्स IT कायद्याच्या कलम 69 चे उल्लंघन करतात. यामध्ये भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका निर्माण करणारा मजकूर आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कारवाई करत हे ॲप्स बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com