ISRO कडून पाच वर्षात 19 देशांच्या 177 परदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण

ISRO कडून पाच वर्षात 19 देशांच्या 177 परदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण

इस्त्रोने जानेवारी 2018 ते नोव्हेंबर 2022 या पाच वर्षांच्या कालावधीत अनेक देशांच्या परदेशी उपग्रहांचं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

इस्त्रोने जानेवारी 2018 ते नोव्हेंबर 2022 या पाच वर्षांच्या कालावधीत अनेक देशांच्या परदेशी उपग्रहांचं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक परदेशी उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. या व्यावसायिक सॅटेलाईट लाँचमधून इस्त्रोने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.

इस्त्रोने व्यावसायिक करार करत अनेक देशांच्य सॅटेलाईट लाँच केले. व्यावसायिक करारांतर्गत PSLV आणि जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेईकल, ज्याला आता LVM-3 म्हणून ओळखले जातं. केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत माहिती देत सांगितले की, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने या व्यावसायिक उड्डाणांमधून सुमारे 1100 कोटी रुपये कमावले आहेत. असे मिळालेल्या माहितीनुसार समजते.

19 देशांच्या 177 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. या 19 देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, कोलंबिया, फिनलंड, फ्रान्स, इस्रायल, इटली, जपान, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, मलेशिया, नेदरलँड, दक्षिण कोरिया, सिंगापूर, स्पेन, स्वित्झर्लंड, ब्रिटन आणि युनायटेड स्टेट्स या देशांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com