आता स्वस्तात पाहता येणार तुमची आवडती वेबसीरिज; ‘नेटफ्लिक्स’ प्लॅन्समध्ये मोठी कपात

आता स्वस्तात पाहता येणार तुमची आवडती वेबसीरिज; ‘नेटफ्लिक्स’ प्लॅन्समध्ये मोठी कपात

Published by :

गेल्या काही महिन्यात नेटफ्लिक्सवर लोकांना अनेक दर्जेदार चित्रपट, वेबसीरिज पाहायला मिळत आहेत. मात्र नेटफ्लिक्सचे प्लॅन्स महाग असल्याने अनेकांना त्याचा आनंद घेता येत नाही. मात्र नेटफ्लिक्सकडून प्लॅनच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे.

नेटफ्लिक्सला भारतात Disney प्लस हॉटस्टार, ॲमेझॉन प्राईम यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सकडून प्लॅन्सच्या किंमती घट करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आपला यूजर बेस वाढावा म्हणून देखील नेटफ्लिक्सकडून प्रयत्न चालू आहेत. या प्लॅन्सच्या किमती कमी झाल्या आहेत : मोबाईलसाठी प्रसिद्ध असलेला नेटफ्लिक्सचा मोबाईल प्लॅनसाठी 199 रुपये प्रति महिना द्यावे लागत होते. मात्र येणाऱ्या नवीन वर्षापासून फक्त 149 रुपये प्रति महिना आनंद घेता येणार आहे. या प्लॅनमध्ये फक्त मोबाईल आणि टॅबलेटवर 480p resolution सोबत नेटफ्लिक्स पाहता येतं.

Basic: या प्लॅनसाठी महिन्याला 499 रुपये मोजावे लागायचे. मात्र त्याची किंमत कमी करून आता 199 प्रति महिना करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये मोबाईल, टॅबलेट, कॉम्प्युटर आणि टीव्हीवर देखील Netflix चा आनंद घेता येतो.

Standard: नवीन वर्षापासून हा प्लॅन विकत घेण्यासाठी महिन्याला 499 रुपये मोजावे लागतील. यासाठी 699 रुपये प्रति महिना मोजावे लागायचे. या प्लॅनमध्ये 1080p रेसोल्युशन सोबत चित्रपटांचा आनंद घेता येतो. या प्लॅनमध्ये मोबाईल, टॅबलेट कॉम्प्युटर आणि टीव्हीवर नेटफ्लिक्स पाहता येतं.

Premium: हा नेटफिक्सचा सर्वात महागडा प्लॅन असून महिन्याला 649 रुपये मोजावे लागतील. या प्लॅनची अगोदरची किंमत 799 रुपये प्रति महिना इतकी होती. हा सर्वात महागडा प्लॅन असण्याचे कारण म्हणजे तुम्हाला 4के रिझोल्युशनमध्ये वेब सिरीज, चित्रपट पाहता येतात. या प्लॅनमध्ये मोबाईल, टॅबलेट कॉम्प्युटर आणि टीव्हीवर नेटफ्लिक्स पाहता येतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com