Lava Blaze 5G
Lava Blaze 5GTeam Lokshahi

'हा' सर्वात स्वस्त स्मार्टफोन करण्यात आला लॉन्च; वाचा सविस्तर

Lava कंपनीने Lava Blaze 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा देशातील पहिला 5G फोन असून या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे.

Lava कंपनीने Lava Blaze 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा देशातील पहिला 5G फोन असून या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे. Lava Blaze 5G स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.5-इंचाचा आहे. तर हा स्मार्टफोन तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून खरेदी करू शकणार आहात.

अनेकांना फोटोग्राफी करण्याची इच्छा असते. त्यामुळे या स्मार्टफोनचा खूप फायदा होणार आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा उपलब्ध करण्यात आला असून प्राथमिक सेन्सर 50MP आहे. आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध केला आहे.

Lava Blaze 5G
व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपने आणले खास फिचर्स

तसेच स्मार्टफोनमध्ये 1600×720 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 6.5-इंच HD + LCD पॅनेल देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 128GBचं स्टोरेज देण्यात आले आहे. Lava Blaze 5G स्मार्टफोन जर तुम्ही खरेदी करणार आहात तर त्यामध्ये दोन रंग उपलब्ध करण्यात आले आहे. एक म्हणजे ग्लास ग्रीन आणि दुसरा म्हणजे ग्लास ब्लू असे रंग आहे.

Lava Blaze 5G स्मार्टफोनची बॅटरी 5,000mAh येवढी आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.1, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक उपलब्ध आहे. आणि फेस अनलॉक आणि साइड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश या स्मार्टफोनमध्ये आहेत.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com