Indian Twitter Account Ban
Indian Twitter Account BanTeam Lokshahi

ट्विटरचा मोठा निर्णय! भारतात 48 हजार ट्विटर अकाउंट बॅन

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने देशात 45 हजार 589 ट्विटर खात्यांवर बंदी घातली आहे.

ट्विटरची (Twitter) जोरदार चर्चा सुरू असतेच. पण जेव्हापासून ट्विटर एलॉन मस्क यांनी विकत घेतले आहे. तेव्हापासून ट्विटर प्रचंड चर्चेत आले आहे. तसेच, ट्विटरने अनेक बदलही केले आहेत. ट्विटरने केलेल्या बदलामध्ये ब्लू टिक असो किंवा ट्विटर मधील नोकर कपात अशा अनेक गोष्टींमुळे ट्विटर चर्चेत आहे. यावेळी ट्विटरने मोठा निर्णय घेतला आहे.

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने भारतातील 45 हजार 589 ट्विटर खात्यांवर बंदी घातली आहे. यामध्ये मुलांचे लैंगिक शोषण, नग्नता आणि संबंधित पोस्ट केल्या जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तर 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान ही खाती बंद करण्यात आली आहेत. ट्विटरकडून एकूण ४८ हजार भारतीयांचे ट्विटर अकाउंट बंद केले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्या आणि भडकवणाऱ्या पोस्टला आळा बसण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Indian Twitter Account Ban
Twitter Down : जगभरातील युजर्सना लॉग इन करताना अडचण

तरी काही दिवसांमध्ये नवे फिचर्स किंवा अपडेट्स युजर्ससाठी घेऊन येणार आहेत. या नवीन फिचर्समध्ये ट्विटरवर ट्विट एडिट, ट्विटर डेटा मॉनिटायजेशन असे नवीन फिचर्स उपलब्ध करू दिले जाणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com