YouTube प्रीमिअमवालं फिचर फ्रीमध्ये वापरायचंय? कसे 'ते' जाणून घ्या

YouTube प्रीमिअमवालं फिचर फ्रीमध्ये वापरायचंय? कसे 'ते' जाणून घ्या

युट्युब प्रीमिअम सबस्क्रीप्शनमध्ये कंपनी युझर्सला अनेक फिचर्स देते. परंतु, यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात. मात्र, प्रीमिअम मधील फिचर्सचा तुम्ही फ्रीमध्येही लाभ घेऊ शकता. कसे 'ते' जाणून घ्या

युट्युब (YouTube) हे प्रसिध्द व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. युट्युब प्रीमिअम (YouTube Premium) सबस्क्रीप्शनमध्ये कंपनी युझर्सला अनेक फिचर्स देते. परंतु, यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात. मात्र, प्रीमिअम मधील फिचर्सचा तुम्ही फ्रीमध्येही लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला पैसेही खर्च करण्याची गरज पडणार नाही. यासाठी तुम्हाला गुगल क्रोमची मदत घ्यावी लागेल.

YouTube प्रीमिअमवालं फिचर फ्रीमध्ये वापरायचंय? कसे 'ते' जाणून घ्या
Facebook New Feature : फेसबुकने आणले मस्त फीचर, यूजर्सचा आनंद गगणात मावेना

कोणतेही पैसे खर्च न करता अँड्रॉइड फोनवर बॅकग्राउंडमध्येही YouTube प्ले केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

यासाठी सर्वप्रथम गुगल क्रोम ब्राउझरमध्ये युट्युब ओपन करा.त्यानंतर तुम्हाला ते डेस्कटॉप व्ह्यूमध्ये ओपन करावे लागेल. यासाठी तुम्हाला क्रोममध्ये वरच्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्समधून दिलेला पर्याय उघडावा लागेल. यामध्ये तुम्हाला डेस्कटॉप साईटचा पर्याय मिळेल. यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही कोणताही व्हिडिओ प्ले करा.

YouTube प्रीमिअमवालं फिचर फ्रीमध्ये वापरायचंय? कसे 'ते' जाणून घ्या
आता कराल मनसोक्त मनोरंजन : Netflix चे प्लॅन स्वस्त होणार

व्हिडिओ प्ले झाल्यानंतर, होमचे बटण दाबा आणि होम स्क्रीनवर या. यानंतर फोनचे नोटिफिकेशन ओपन करून व्हिडिओ प्ले करण्याच्या पर्यायावर क्लिक करा. यासह, व्हिडिओ बॅकग्राउंडमध्ये प्ले होण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही इयरफोनसह म्युझिक प्लेअर म्हणून वापरू शकता.

आयफोनवरही बॅकग्राउंडमध्ये युट्युब प्ले केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला आयफोनवरील क्रोम ब्राउझरवरून यूट्यूब ओपन करावे लागेल. यानंतर, पर्यायावर जा आणि रिक्वेस्ट डेस्कटॉप साईट (Request Desktop Site)वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही व्हिडिओ प्ले केल्यानंतर होम स्क्रीनवर या, तुमचा व्हिडिओ प्ले करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com