Meta AI: फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअ‍ॅपवर दिसणारं निळं वर्तुळ नेमकं काय आहे? जाणून घ्या...

Meta AI: फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअ‍ॅपवर दिसणारं निळं वर्तुळ नेमकं काय आहे? जाणून घ्या...

तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हे नवीन निळे वर्तुळ आलेलं तुम्ही पाहिलंच असाल पण अनेकांना तर त्याचा उपयोग काय? हेही माहीत नसेल.
Published by :
Sakshi Patil

मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये मोबाईलची भर पडली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. लोकांचा दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर स्क्रोलिंग करण्यात जातो. हे ओळखून सोशल मीडिया सेवा देणाऱ्या संस्था ग्राहकांना दर दिवशी नवनवे फीचर्स देत आहे. यात भर पडली आहे मेसेंजरवर दिसणाऱ्या निळ्या वर्तुळाची.

तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हे नवीन निळे वर्तुळ आलेलं तुम्ही पाहिलंच असाल पण अनेकांना तर त्याचा उपयोग काय? हेही माहीत नसेल.

हे निळे वर्तुळ Meta AI चे प्रतिनिधित्व करतं, Meta ने लाँच केलेला हा स्मार्ट असिस्टंट आहे आणि हा फिचर आपण विनामूल्य वापरू शकतो. Meta AI दोन महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आला होता, परंतु फक्त काही देशांमध्ये उपलब्ध होता. पण आता Meta AI भारतातही उपलब्ध करण्यात आला आहे.

Meta AI हे एक अतिशय प्रगत AI मॉडेल आहे, जे तुमच्या प्रश्नांची उत्तरं तात्काळ देऊ शकतं. डॉक्युमेंट बनवण्यासाठी मदत करू शकतं आणि भाषांचे भाषांतर देखील करू शकतं. ईमेल लिहिण्यासाठी, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसाठी, एक्सेल शीट बनवण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. इंग्रजी शिकण्यापासून ते करिअर मधील प्रगतीपर्यंत सर्व विषयांवर त्याच्याकडून माहिती मिळू शकते. हे AI मॉडेल LLMA-3 मॉडेलवर आधारित आहे, जे जगातील सर्वात प्रगत भाषा मॉडेलपैकी एक आहे.

Meta AI ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण थेट फेसबुक आणि इन्स्टाग्राम फीडवर त्याचा वापर करू शकतो. शिवायव्हॉट्सॲपवर आपण जसे चॅटिंग करतो तसंच निळ्या वर्तुळावर क्लिक करून माहिती विचारली तरी पुढच्या सेकंदाला तुम्हाला उचित रिप्लाय मिळतो. जिथे त्याच्याकडे माहितीची कमतरता असेल अशा विषयाबाबत तो नम्रपणे नकार देतो आणि याबद्दल तुमच्याकडे माहिती उपलब्ध असल्यास तुम्ही ती फीड करा असेही सांगतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com