India
तृणमूल काँग्रेस गोव्यात स्वबळावर निवडणूक लढवणार
तृणमूल काँग्रेस गोव्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे, सर्व 40 जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती पक्षात नव्याने प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तृणमूल काँग्रेस गोव्यात सर्व 40 जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना पक्षात प्रवेश देण्याबाबत फालेरो यांनी स्वच्छ प्रतिमेच्या लोकांनाच संधी देऊ, असे सावध उत्तर दिले. तसेच पक्षाच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गोवा दौर्याबाबत घटस्थापनेनंतर निर्णय होणार आहे.

