Accident
Accident

Uttarpradesh| बस-टेम्पोच्या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू; मोदी-योगींकडून मदत जाहीर

Published by :
Published on

उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे बस आणि टॅम्पोच्या धडकेमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सचेंडी पोलिसांनी दिली . जखमींना लाला लजपत राय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

"दोन वाहनांची धडक झाल्यानंतर बस पलटली. ही बस लखनऊवरुन दिल्ली जात होती. चार जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती कानपूरचे पोलीस निरीक्षक मोहीत अग्रवाल यांनी दिली. जखमी व्यक्तींनी ते कानापूर जिल्ह्यातील सचेंडी येथील असल्याचे सांगितले आहे. जखमीपैकी अनेकजण हे येथील बिस्कीटच्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार आहे. हे कामगार टेम्पोने कामासाठी कारखान्यामध्ये जात असतानाच हा अपघात झाल्याची माहिती मोहित यांनी दिली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला तपास पोलीस करत आहे, असंही मोहीत यांनी स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com