शिवभक्तांकडून 32 मणाच्या अनोख्या सिंहासनाची प्रतिकृती

किल्ले रायगडावर ऐतिहासिक आठवणींना उजाळा देणारा 351वा राज्यभिषेक सोहळा आज पार पडत आहे.
Published by :
Team Lokshahi

किल्ले रायगडावर ऐतिहासिक आठवणींना उजाळा देणारा 351वा राज्यभिषेक सोहळा आज पार पडत आहे. आज संपूर्ण रायगड फुलांनी आणि हजारो शिवभक्तांनी रायगड सजलेला पाहायला मिळत आहे.

रायगडावर दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. किल्ले रायगड परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. होळीच्या माळावर ढोलताशाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर मावळ्यांनी स्वच्छतेचा संदेश देखील दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com