जळगावच्या सुवर्ण नगरीत नागरिकांची गर्दी

दोन हजारांच्या नोटा उद्यापासून चलनातून बाद होणार
Published by :
Team Lokshahi

दोन हजारांच्या नोटा उद्यापासून चलनातून बाद होणार असून नोटा बदलून घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात सोन्याचा भाव कमी झाल्यामुळे पितृपक्ष असूनही जळगाव सुवर्णनगरीत दोन हजारांच्या नोटांच्या बदल्यात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी प्राधान्य दिले आहे. गेल्या आठ दिवसांत जळगाव सुवर्ण नगरीत कोट्यावधींची उलाढाल झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com