Mumbai Corona Update : राज्यात 24 तासांत कोरोनाचे 22 नवे रुग्ण

राज्यामध्ये सोमवारी कोरोनाचे 22 नवे रुग्ण सापडले असून राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 422 इतकी झाली आहे. तर, 32 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Published by :
Team Lokshahi

राज्यामध्ये सोमवारी कोरोनाचे 22 नवे रुग्ण सापडले असून राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 422 इतकी झाली आहे. तर, 32 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सोमवारी सापडलेल्या 22 नव्या रुग्णांमध्ये मुंबईतील 10, ठाण्यातील 5, पुण्यातील 4, नवी मुंबई व मालेगावसह सांगलीमध्ये प्रत्येकी एक करोना रुग्ण सापडला. सक्रिय 422 रुग्णांमध्ये मुंबईतील 129, पुण्यातील 58, नवी मुंबईत 52, ठाण्यात 35, पिंपरी-चिंचवडमध्ये 20, साताऱ्यात 18, छत्रपती संभाजीनगरमधील 21, अमरावतीमधील 12 रुग्णांचा समावेश आहे. सक्रिय रुग्णांपैकी 93.1 टक्के रुग्ण गृहविलगीकरणामध्ये असून, केवळ 6.9 टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. या रुग्णांपैकी 11 जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. राज्यात सोमवारी 32 रुग्ण बरे झाले. तसेच राज्यात सोमवारी 1647 चाचण्या करण्यात आल्या असून, त्यातील 1.33 टक्के रुग्ण बाधित आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com