Mumbai Railway Motorman Vacant: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटरमनची 313 पदे रिक्त

मध्य रेल्वेत मोटरमनच्या 30 टक्के जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. रिक्त जागांमुळे उर्वरित मोटरमनवर कामाचा ताण वाढला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मध्य रेल्वेत मोटरमनच्या 30 टक्के जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. रिक्त जागांमुळे उर्वरित मोटरमनवर कामाचा ताण वाढला आहे. मुंबई विभागात मंजूर 1 हजार 76 पदांपैकी मोटरमनची 313 पदे रिक्त असल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. रिक्त पदांमुळे लोकलच्या दैनंदिन फेऱ्यांवरही परिणा होत असल्याचं समोर आलं आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मंजूर 1076 पदांपैकी 313 मोटरमन पदे रिक्त आहेत. तर, फक्त 763 मोटरमन कार्यरत आहेत. मोटरमनची जवळपास 30 टक्के पदे रिक्त आहेत. तब्बल 313 मोटरमनची पदे रिक्त असल्याने, लोकल फेऱ्या चालवण्यासाठी इतर मोटरमनला जादा तास काम करावे लागत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com