व्हिडिओ
Buldhana Crime News : साडेचार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी 21 वर्षीय आरोपीला केली अटक
बुलढाणा जिल्ह्यातील टूनकी गावात २१ वर्षीय युवकाने साडेचार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस, पोलिसांनी आरोपीला अटक केली.
बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टूनकी गावातील एका २१ वर्षीय नराधमाने साडेचार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. चिमुकलीला संत्र्याच्या मळ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बुलढाण्यातील सोनाळा पोलिसांनी नराधमाला अटक केली असून, गुन्हा नोंदवला आहे. पीडित चिमुकलीवर अकोल्याच्या रुग्ण्यालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.