Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये आढळले गुईलेन बॅरे सिंड्रोमचे 8 रुग्ण
पुण्यातील पिपंरी- चिंचवडमध्ये गुईलेन बॅरे सिंड्रोमचे 8 रुग्ण आढळलेले आहेत. ८ रुग्णामधील ३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील मोरेवाडी पिपंळे गुरव आदी परिसरातील रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. आठ रुग्णांपैकी महानगरपालिकेच्या वायसीएममध्ये एक संशयित आणि दोन जणांना लागण झालेली आहे. त्यातील दोन रुग्ण ठणठणीत बरे झालेत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय आहे गुईलेन बॅरे सिंड्रोम आजार कसा होतो? गुईलेन बॅरे सिंड्रोम लक्षण काय? या बातमीमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
काय आहे गुईलेन बॅरे सिंड्रोम आजार.
गुईलेन बॅरे सिंड्रोम हा दुर्मिळ आजार आहे. हा आजार रोगप्रतिकारक शक्ती कमी करते. सुरुवातीला हाता पायाला झिणझिण्या येतात. स्नायू कमकुवत होतात. छातीचा स्नायू कमकुवत झाल्याने श्वास घेण्यास अडथळा येतो. शरीराला लकवा मारू शकतो पण हा लकवा काहीकाळापुरता असल्याचे माहिती मिळाली आहे. या आजारांवर लवकरात लवकर उपचार केले नाहीतर, या आजार गंभीर होऊ शकतो.
गुईलेन बॅरे सिंड्रोमची लक्षण काय?
हात पाय दुखतात
श्वास घेण्यास समस्या होतात.
तोंडावरील अशक्तपणा दिसू लागतो.
रक्तदाबाची समस्या होऊ शकतात