Sanjay Raut: 'नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा' राऊतांचा आरोप

नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Published by :
Sakshi Patil

नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 'राजकारणासाठी पैसा कुठून येतो याचा खुलासा करावा' तसेच 800 कोटी कोणाकडे गेले याची चौकशी व्हावी अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे.

नाशिक महानगरपालिका हद्दीत नगर विकास खाते अंतर्गत भूसंपादन घोटाळा आणि त्यातून झालेले आठशे कोटीचे गैरव्यवहार नाशिकमधल्या आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना भूसंपादनाच्या नावाखाली आठशे कोटी रुपयांची कशी खैरात केली आणि हे 800 कोटी बिल्डरांच्या माध्यमातून कोणाकडे गेले हे मी तुम्हाला 2 दिवसांत पुराव्यासह दाखवीन, असं राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com