CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एका तरुणाकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा पाठलाग करण्यात आला.

एका तरुणाकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा पाठलाग करण्यात आला. वांद्रे-वरळी सी-लिंक येथे रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे कार घेऊन निघालेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्याविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या ३० वर्षीय तरुणाचं नाव शुभमकुमार असून तरुण माउंट मेरी परिसर वांद्रे पश्चिम येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११:१५ च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा वरळीच्या दिशेने जात असताना, एक कारचालक त्याची गाडी भरधाव चालवत लेन क्रमांक ७ मध्ये आला.

पोलिसांनी त्याला लेन ६ मध्ये जाण्याचा इशारा केला. मात्र, त्याने पोलिसांचं न ऐकता लेन क्रमांक ७ मध्यूनचं गाडी नेली. पोलिसांनी वरळी वाहतूक विभागाच्या मदतीने त्याला थांबविलं आणि गुन्हा दाखल केला असून चौकशी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com