Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांच्या विरोधात बेळगावात गुन्हा नोंद

प्रसिद्ध सिनेअभिनेते प्रकाश राज यांच्या विरोधात बेळगावात गुन्हा नोंद झाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

प्रसिद्ध सिनेअभिनेते प्रकाश राज यांच्या विरोधात बेळगावात गुन्हा नोंद झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाचे प्रमुख तथा बुडाचे नगररचना अधिकारी बी. व्ही. हिरेमठ यांनी मंगळवारी कॅंप पोलिस ठाण्यात प्रकाश राज यांच्या विरोधात तक्रार दिली होती.

त्या तक्रारीची दखल घेत कॅंप पोलिसांनी प्रकाश राज यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. याआधी बेळगाव ग्रामीणच्या आमदार व महिला बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर आता प्रकाश राज यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com