Pune : पुण्यातील नामांकित बिल्डर रवींद्र साकलांवर गुन्हा दाखल, साकलांसह 5 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

पुण्यातील नामांकित बिल्डर रवींद्र साकलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र साकलांसह 5 जणांवर फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुण्यातील नामांकित बिल्डर रवींद्र साकलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र साकलांसह 5 जणांवर फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रविराज ग्रुपच्या साकला बंधूंवर गुन्हा दाखल झाल्याने बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

रविराज बोकाडिया ,रवींद्र साकला, अभिनंदन साकला, रविराज अभिनंदन असोसिएट एलएलपी आणि अंबादास पाटील बाखाडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी परिसरात असलेल्या एका लष्करी कर्नल अधिकाऱ्याचे 49 लाख रुपये आगाऊ रक्कम घेऊन त्यानी साकला बंधूकडुन खरेदी केलेले दुकान त्याना वेळेत न देता फसवणूक केल्याप्रकरणी रविराज फर्मच्या ५ जणावर वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com