व्हिडिओ
Mumbai Metro News : मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार! लवकरच चेंबूर-मानखुर्द दरम्यान धावणार मेट्रो
मुंबईच्या पूर्व उपनगरात राहणाऱ्या लोकांचा प्रवास आणखी सोपा होणार आहे. चेंबूर-मानखुर्द मेट्रो लवकरच धावणार
मुंबईच्या पूर्व उपनगरात राहणाऱ्या लोकांचा प्रवास आणखी सोपा होणार आहे. लवकरच चेंबूर ते मानखुर्ददरम्यान मेट्रो लाईन 2 बी लवकरच सुरू होणार होणार असून ही मेट्रो धावणार आहे. मुंबई मेट्रो यलो लाईनच्या पहिल्या टप्प्याची चाचणी येत्या 16 एप्रिलपासून सुरू होणार आहे.
हा मार्ग एकूण 5.4 किलोमीटर लांबीचा असणार आहे. तसेच या मार्गावरील पाच स्थानक-डायमंड गार्डन, शिवाजी चौक, BSNL मेट्रो, मानखुर्द आणि मंडले या स्थानकांची कामं पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या निरीक्षणाखाली ही चाचणी केली जाणार आहे.