Abdul Sattar | अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा, 'सिल्लोड पुढची विधानसभा निवडणूक लढणार नाही'

अब्दुल सत्तारांनी मोठी घोषणा केली आहे की ते सिल्लोडची पुढील विधानसभा निवडणूक लढणार नाहीत. नगरपरिषदेची निवडणूक त्यांची शेवटची निवडणूक असेल.
Published by :
shweta walge

शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. सिल्लोड पुढची विधानसभा निवडणूक लढणार नाही, नगरपरिषदेची निवडणूक माझी शेवटची निवडणूक असेल अस अब्दुल सत्तार म्हणालेत. सिल्लोड येथील अंभई येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अब्दुल सत्तार यांनी ही घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com