व्हिडिओ
Abu Azmi : औरंग्यजेबाच्या 'त्या' वक्तव्यावर अबू आझमींचा यूटर्न
अबू आझमी यांनी औरंग्यजेबाच्या वक्तव्यावर यूटर्न घेतला आहे. त्यांनी माफी मागताना सांगितले की, त्यांच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. इतिहासकारांनी म्हटल्याप्रमाणेच त्यांनी औरंग्यजेबाबद्दल म्हटले आहे आणि कोणत्याही महापुरुषांचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता.
अबू आझामी यांनी सरकारला माफीनामा दिला आहे. अबू आझामी म्हणाले की, "माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला गेला. औरंगजेब रहमतुल्लाह अलेहबद्दल मी तेच म्हटले आहे जे इतिहासकार आणि लेखकांनी म्हटले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल कोणतेही अपमानजनक भाष्य केलेले नाही. परंतु तरीही जर माझ्या शब्दांमुळे कोणी दुखावले असेल तर मी माझे शब्द, माझे विधान मागे घेतो." असे अबू आझामी यांनी म्हटले आहे.