Atal Setu Bridge: अटल सेतूवर पहिल्याच दिवशी 264 चालकांवर कारवाई; कारण काय?

अटल सेतू सामान्य नागरिकांसाठी सुरू केल्यानंतर रविवारी रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून सेल्फी काढणाऱ्यांची संख्याच अधिक दिसून आली.
Published by :
Team Lokshahi

अटल सेतू सामान्य नागरिकांसाठी सुरू केल्यानंतर रविवारी रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून सेल्फी काढणाऱ्यांची संख्याच अधिक दिसून आली. यावेळी अटल सेतूवर वाहन उभे करून इतर प्रवशांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी 264 वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. या चालकांवर प्रत्येकी 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. अटल सेतूच्या 10 कि.मी. 400 मीटर एवढ्या हद्दीच्या वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलीस पाहत आहेत. उर्वरीत भागाची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांकडे आहे. रविवारी पोलिसांनी सेतूवरील चालकांना गाडी न थांबवण्याची विनंती केली. त्यानंतरही अनेकजण वाहन थांबवत होते. मोटर वाहन कायदा कलम 122 व 177 कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. प्रत्येकी 500 रुपये दंड आकारण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com