Sahil Khan Arrested : छत्तीसगड येथून अभिनेता साहिल खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी साहिल खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी साहिल खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर अभिनेता साहिल खान याला पूर्व जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायलयात धाव घेतली आहे. मात्र न्यायालयाने त्याला नकार दिला आहे आणि त्याची याचिका फेटाळून लावली आहे. माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरुन महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणामध्ये 31 पेक्षा जास्त जणांविरोधात माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये अभिनेता साहिल खान हा ही आहे आणि त्यासा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. साहिल खानची मुंबई पोलीस आयुक्तांमध्ये चौकशी करण्यात आली होती. तर या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन मुंबई पोलिसांच्या गुन्ह्यामध्ये इडीने गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com