आदित्य ठाकरे - राहुल नार्वेकरांमध्ये जुंपली

रद्द झालेल्या घाना दौऱ्यावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आदित्य ठाकरेंमध्ये चांगलीच जुंपली आहे.
Published by :
Team Lokshahi

रद्द झालेल्या घाना दौऱ्यावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आदित्य ठाकरेंमध्ये चांगलीच जुंपली आहे. प्रशासकीय कारणानं घाना दौरा दोन दिवसांआधी रद्द केलेला असताना आदित्य ठाकरे उगाचच श्रेय घेत असल्याचा टोला राहुल नार्वेकरांनी लगावला आहे. घाना दौरा 26 सप्टेंबरला रद्द झाला होता. त्यानंतर 28 सप्टेंबरला आदित्य ठाकरे दौरा आपल्यामुळं रद्द झाल्याचं सांगत सुटल्याचा आरोप नार्वेकरांनी केला आहे.

कुणाच्याही दबावासमोर झुकणार नाही, असा निर्धारही राहुल नार्वेकरांनी केला आहे. विधान परिषदेच्या आमदारांकडून मतदारसंघ चालवत नसल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. त्याबरोबरच शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी नियमानुसार होणार असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com