Eknath Shinde
Ajit Pawar
Eknath Shinde Ajit Pawarteam lokshahi

Ajit Pawar vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे अजित पवारांमधील संघर्ष शिगेला?

एकनाथ शिंदे अजित पवारांमधील संघर्ष शिगेला पोहचलाय की काय अशी स्थिती आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

एकनाथ शिंदे अजित पवारांमधील संघर्ष शिगेला पोहचलाय की काय अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांविरोधात आघाडी उघडल्याची स्थिती आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन अजित पवार गटाच्या आमदारांनी केलेल्या आंदोलनावरुन मुख्यमंत्र्‍यांनी दोन वेळा जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या आधीही पालकमंत्रिपदावरुन अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात पालकमंत्रिपदावरुन संघर्ष निर्माण झाला होता.

नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रिपद अजित पवार गटाला मिळावं यासाठी अजूनही अजित पवार प्रयत्न करत आहेत. मराठा आंदोलनात अजित पवार कुठंच एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ठाम उभे राहिलेले दिसले नाहीत. त्यामुळं आता महायुती सरकारमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे अशा संघर्षाला तोंड फुटल्याची चर्चा सुरु झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com