Ajit Pawar: पीडीसीसी बँकेतील पैसे वाटपाच्या आरोपावर अजित पवारांची प्रतिक्रिया

पुणे जिल्हा बँकेतील पैसे वाटपाच्या आरोपावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Sakshi Patil

बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. यावेळी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचे व्हिडिओ तसेच पीडीसी बँक रात्री बारानंतर सुरू असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

आता पुणे जिल्हा बँकेतील पैसे वाटपाच्या आरोपावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक बँकेत सीसीटीव्ही असतात ते चेक करावेत. बँकेमध्ये काय सुरू होते त्याचा तपास होईल. त्यात दोन्ही अर्थ निघू शकतात, मागचे फोटो पण दाखवू शकतात नाहीतर खरे काय घडलं? ते सीसीटीव्हीमध्ये दिसेलच, असं अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com