Rohit Pawar On Ajit Pawar : रोहित पवारांच्या 'त्या' टीकेला अजित पवारांचं जोरदार प्रत्यूत्तर

'कुणी पक्ष चोरला नाही, शिंदेंनीही नाही आणि मीही नाही' असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

'कुणी पक्ष चोरला नाही, शिंदेंनीही नाही आणि मीही नाही' असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तर 80% टक्के लोक शिंदेंसोबत असल्यानं पक्ष, चिन्ह त्यांना मिळालं. आम्ही चोर दरोडेखोर नाही, आम्ही काम करणारी माणसं असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी अजित पवारांवर टीका केली आहे, म्हणाले की, आपल्या मशालला तुम्ही 6 लाखाला निवडणून देणार असं समजू का? आणि विरोधात जो घड्याळ आहे जो पक्ष आहे त्याला पायाखाली तुडवणार की नाही तुडवणार? त्यामुळे ती पायाखाली तुडवण्याची वेळ आलेली आहे. साहेबांवर जो अन्याय झाला त्यांना असं वाटेल नेते त्यांच्याकडे गेले, नेते तिथे गेले तरी आमच्याबरोबर निष्ठावंत कार्यकर्ते आणि महाराष्ट्राची जनता आहे त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही.

रोहित पवारांच्या 'त्या' टीकेला अजित पवारांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलं आहे, म्हणाले की, मी काही कोणता पक्ष चोरलेला नाही. आज 80% टक्के लोक शिंदेंसोबत असल्यानं पक्ष, चिन्ह त्यांना मिळालं. आम्ही चोर दरोडेखोर नाही, आम्ही काम करणारी माणसं आहोत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com