MahaKumbh Mela 2025 : प्रयागराज मधील कुंभमेळ्यात अक्षय कुमार यांचं शाहीस्नान
भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा, अर्थात महाकुंभ मेळा प्रयागराजमध्ये सुरु आहे. या महाकुंभमेळ्यामध्ये त्रिवेणी संगम, भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांचा अद्भुत संयोग जुळून आला आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी 13 जानेवारी 2025 रोजी प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरु झाला आहे, महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच 26 फेब्रुवारीला महाकुंभमेळ्याची सांगता होणार आहे.
या कुंभमेळ्यामध्ये जगभरातून भाविकांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये आता बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार हा महाकुंभमेळ्यामध्ये उपस्थित राहिला. यावेळी अक्षयकुमार यांने शाही स्नानाचा आनंद घेतला. त्यानंतर त्याने माध्यमांशी बोलताना भावना व्यक्त केल्या.
माध्यमांशी बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, "कुंभमेळ्यात स्नान करुन खूप छान वाटत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार व्यक्त करतो की, त्यांनी चांगल्या प्रकारे नागरिकांची व्यवस्था केली आहे. तसेच या महाकुंभमेळ्यामध्ये मुकेश अंबानी, गौतम अदानी यांसारखे अनेक दिग्गंज सहभागी झाले. त्यामुळे किती उत्तम व्यवस्था करण्यात आली हे समजते आहे ". असे बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार यांने म्हटले आहे.