Akshay Shinde Badlapur Case Update: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात पोलीस जबाबदार?

बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या संशयास्पद एन्काऊंटर प्रकरणात पोलीस जबाबदार असल्याचे हायकोर्टात सादर केलेल्या अहवालात स्पष्ट.
Published by :
Prachi Nate

बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू संशयास्पद असल्याच म्हटलं जात आहे. बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या कथित चकमकीचा दंडाधिकारी चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. मृत व्यक्तीशी झालेल्या झटपटीत 5 पोलिसांकडून वापरलेला बळ अनावश्यक होता.

आरोपीच्या मृत्यूसाठी 5 पोलीस जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल हायकोर्टात सादर अक्षयचा स्वरक्षणासाठी एन्काऊंटर केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट नाहीत.

तसेच अक्षयवर गोळीबार केलेला अन्यायकारक आणि संशयास्पद आहे, असा फॉरेन्सिकचा अहवाल आहे. यादरम्यान पोलीस एन्काऊंटरमध्ये आरोपी अक्षय शिंदेंचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू, सरकारी वकिलांची कोर्टात अशी माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com