समीर वानखेडेंवरील आरोप गंभीर; ‘सीबीआय’चा उच्च न्यायालयात दावा

समीर वानखेडेंवरील आरोप गंभीर; ‘सीबीआय’चा उच्च न्यायालयात दावा
Published by :
Siddhi Naringrekar

आर्यन खान याच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई क्षेत्राचे माजी संचालक समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा रद्द करा, अशी मागणी सीबीआयने उच्च न्यायालयाकडे केली आहे.

वानखेडे यांच्याविरोधातील आरोप सकृतदर्शनी खरे असल्याचे आढळून आले असून ते अत्यंत गंभीर आणि संवेदनशील स्वरूपाचे आहेत. सरकारी सेवेतील अधिकाऱ्याने खासगी व्यक्तींच्या साथीने भ्रष्टाचार करणे, फौजदारी कट रचून खंडणीसाठी धमकावल्याचे हे आरोप आहेत. त्यामुळे वानखेडे यांना अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा कायम ठेवण्यात आल्यास प्रकरणाच्या तपासावर त्याचा विपरीत परिणाम होईल, असा दावा सीबीआयने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com