Amravati : महिलांच्या प्रकरणात हयगय केल्यास...; चाकणकरांनी अधिकाऱ्यांना दिली तंबी

राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी आज पार पडते आहे.
Published by :
Team Lokshahi

राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी आज पार पडते आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज जनसुनावणी करण्यात येत आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत हे जनसुनावणी पार पडत असून यावेळी महिलांना संबोधित करताना रूपाली चाकणकर यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. महिलांच्या प्रकरणात हयगय केल्यास यावर आयोगाचे लक्ष असते. महिलांनी आयोगाकडे तक्रार केली आणि जनसुनावणीमध्ये त्याचा निपटारा झाला नाही. तर आयोगाला कारवाई करावी लागेल याची नोंद संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी असे प्रतिपादन केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com