धाराशिवमध्ये निसर्गाचा अद्भुत अविष्कार, वीज पडलेल्या जागेतून येत आहे निळं पाणी

धाराशिवमध्ये निसर्गाचा अविष्कार पहायला मिळाला आहे, रंगीत पाण्यामुळे ग्रामस्थांमध्ये चर्चांना उधाण.
Published by :
Team Lokshahi

धाराशिवमध्ये निसर्गाचा अविष्कार पहायला मिळाला आहे, रंगीत पाण्यामुळे ग्रामस्थांमध्ये चर्चांना उधाण येत आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मसला गावात शेतात वीज पडल्यानंतर जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी येत असल्याची माहिती मिळत आहे.

जमिनीतून येत असलेल्या निळ्या पाण्यामुळे ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून, भूगर्भातून येणारं रंगीत पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. हे पाणी का येत आहे, या मागील कारण शोधण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com