महाराष्ट्राच्या तोंडचा घास गुजरातच्या तोंडात; अंबादास दानवेंची टीका

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा मुंबईत रोड शो आयोजीत करण्यात आला असून, त्यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.
Published by :
Team Lokshahi

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा मुंबईत रोड शो आयोजित करण्यात आला असून, त्यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, गेल्या काही काळात महाराष्ट्रातले मोठे उद्योग गुजरातला गेले आहेत. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती की, येणाऱ्या काळात यापेक्षाही मोठे उद्योग हे महाराष्ट्रात येणार आहेत. अद्यापही ते आलेले नाहीत. महाराष्ट्राच्या तोंडचा घास गुजरातच्या तोंडात गेल्याची टीका दानवेंनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com