Amit Shah Daura: अमित शाह यांचा आज नांदेड दौरा; धार्मिक, समागम कार्यक्रमाला उपस्थित राहणार

Nanded Visit: अमित शाह नांदेड दौऱ्यासाठी उपस्थित राहणार आहेत, जेथे 350 व्या गुरु तेग बहादूर शहिदी समारंभाचे आयोजन झाले आहे.
Published by :
Dhanshree Shintre

शीख धर्मीयांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम सोहळ्यानिमित्त नांदेडमधील मोदी मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा सायंकाळी साडेचार वाजता उपस्थित राहणार असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री पंकजा मुंडे दुपारी तीन वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचा हा २५ जानेवारी २०२६ रोजीचा नांदेड दौरा राजकीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे.

नांदेड शहरात या दौऱ्यामुळे हालचालींना वेग आला असून, प्रशासनाने सर्व तयारी अंतिम केली आहे. हा सोहळा शीख समाजासाठी ऐतिहासिक असून, वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com