Amol Mitkari Vs Shiva Mohod : अजित पवार गटात वाद! अमोल मिटकरी अकोल्यात शिवा मोहोड यांच्यावर संतापले

राष्ट्रवादी अजित पवार गटातला अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
Published by :
Team Lokshahi

राष्ट्रवादी अजित पवार गटातला अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. अकोल्यात मिटकरी आणि मोहोड यांच्यातला अंतर्गत वाद उघड झाला आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोल्यात पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवा मोहोड यांच्या जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी नियुक्तीवर आमदार अमोल मिटकरी यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. शिवा मोहोडची तक्रार अजित पवारांकडे केली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मिटकरी आणि मोहोड यांच्या या वादामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद पक्षाच्या आणि जनतेच्या समोर आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com